पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 साठी जपान हा कंट्री फोकस देश आहे. जपानने आपल्या चित्रपटांना आजच्या काळात वेगळ्या उंचीवर नेले आहे. देशाच्या विकसित होत असलेल्या चित्रपट भाषेला आकार देऊन उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या आणि लेखकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे. यंदा निवडलेल्या सहा शीर्षकांमध्ये - स्मृती आणि ओळखीच्या अंतरंग संकल्पनांपासून ते चित्रपट महोत्सव-विजेत्या मानसशास्त्रीय थ्रिलर, समलैंगिक कथा, युवा विज्ञान कथा, काव्यात्मक आणि नॉन-लिनियर प्रयोगाचा समावेश आहे. त्यामुळे आशियाई चित्रपट चाहत्यांसाठी यंदाचा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.
चित्रपटसृष्टीतील महिलांनी दिग्दर्शित केलेले 50 हून अधिक चित्रपट महोत्सवाचा भाग असणार आहेत. यासोबतच नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या 50 हून अधिक कलाकृती महोत्सवाच्या समावेशकता आणि उदयोन्मुख कलाकारांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे प्रतिबिंब आहे. यावर्षी 81 देशांमधून 240 हून अधिक चित्रपट, 13 जागतिक प्रीमियर, 4 आंतरराष्ट्रीय प्रीमियर आणि 46 आशियाई प्रीमियर होणार आहे. तसेच 127 देशांमधून विक्रमी 2,314 कलाकृतींची नोंद झाली आहे. यामुळे जागतिक स्थरावर कितीचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.
हिंदी आणि दाक्षणात्य सिनेसृष्टीमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोमहोत्सवाच्या समारोप समारंभात रजनीकांत यांना त्यांच्या दिग्गज चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.
81 देशांमधून एकूण 240 हून अधिक चित्रपट.
आंतरराष्ट्रीय विभागात 160 चित्रपट, ज्यात 13 जागतिक प्रीमियरचा समावेश.
80 हून अधिक पुरस्कार विजेते चित्रपट. 21 अधिकृत ऑस्कर-नामांकन मिळालेले चित्रपट प्रदर्शित होतील.
सिनेमा ऑफ द वर्ल्ड अंतर्गत 55 हून अधिक चित्रपट आणि महोत्सवात सहभागी झालेल्या 133 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश.