पणजी; दीपक जाधव : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे गोव्यात दाखल झाले आहेत. अनुराग ठाकूर यांच्याहस्ते ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन होणार आहे. सोमवारी, दुपारी मंत्री माविन गुदिन्हो यांनी ठाकूर यांचे विमानतळावर स्वागत केले. (IFFI 2023 Goa)
गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'मास्टरक्लास' मधील सर्व सत्रे आता सर्व IFFI प्रतिनिधींसाठी विनामूल्य खुली असणार आहे. त्यामुळे मास्टरक्लासमधील प्रवेश सहज, सोपा असेल. मास्टरक्लासमध्ये विविध मुलाखती, सेशन्स असतात. त्यातून सिनेमा ही कला, कलावंत यांची माहिती उलगडत असते. त्यामुळे आता या सत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी चुकवू नका.