CM Dr. Pramod sawant pudhari photo
गोवा

CM Dr Pramod Sawant | मी गोव्याताच राहणार; दिल्लीला जाण्याच्या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा स्पष्ट टोला

CM Dr Pramod Sawant | दिल्लीला जाण्याच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचा टोला

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मी दिल्लीला जाण्याबाबतच्या विधानाचा काहींनी वेगळाच अर्थ काढला. काहींना आनंद झाला, तर काहींना दुःख झाले. भारतीय जनता पक्षाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, यापुढेही अशी संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. आपण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुलाखткаराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंगळवारी पत्रकारांनी पणजी येथे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दिल्लीला जाण्याच्या विधानावर विचारले असता, डॉ. प्रमोद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. जर पक्षाने आदेश दिल्यास तुम्ही दिल्लीत जाणार काय, असा मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला असता, आपण पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश मला पाळावाच लागेल, असे म्हटले होते. मात्र, काहींनी त्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सावंत म्हणाले की, आपण मुळात भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाने त्यांना अनेक वर्षे गोव्याची सेवा करण्याची संधी दिली आहे, जी ते भविष्यातही सुरू ठेवण्याची आशा बाळगतात. ते म्हणाले की, त्यांच्या दिल्लीला जाण्याच्या शक्यतेबद्दलची बातमी समोर आल्यावर काही लोक आनंदी होते, तर काहीजण निराश झाले होते. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT