murder case Pudhari
गोवा

Goa murder case | तो खून कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचनेतूनच

साळगाव खून प्रकरण; संशयितास आठ दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : साळगाव येथील रुक्मिणी राठोड हिच्या खून प्रकरणामागे पती-पत्नीतील कौटुंबिक वाद आणि आर्थिक अडचणी हेच प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद भालचंद्र राठोड (४०, रा. गदग कर्नाटक) याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी विनोद राठोड व त्याच्या पत्नीमध्ये काही काळापासून वाद होत होते. घरगुती खर्च, कर्जबाजारीपणा तसेच आर्थिक ताणतणावामुळे दोघांमधील मतभेद तीव्र झाले होते. हाच वाद पुढे टोकाला जाऊन हिंसक रूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेच्या दिवशी त्यांची तीनही मुले शाळेत गेलेली असताना संशयित विनोद राठोड यांनी रागाच्या भरात पत्नी रुक्मिणी राठोड हिचा गळा चिरून खून केला व स्वतः पोलिसात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जप्त केले. शेजाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल रेकॉर्डचीही तपासणी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT