Tarun Tejpal Case  
गोवा

Tarun Tejpal Case | तरुण तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान! गोवा सरकारच्या अर्जावर उच्च न्यायालयाचा आज महत्त्वपूर्ण निकाल

Tarun Tejpal Case | तहलका प्रकरण: तरुण तेजपाल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, हायकोर्ट आज सुनावणार निकाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवाकथित लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी तहलका संपादक तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त करणाऱ्या खटल्याविरोधात गोवा सरकारने दाखल केलेल्या अर्जावर उच्च न्यायालय गुरुवारी (दि. ६) निकाल देणार आहे.

न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर करण्यासाठी प्रकरण सूचीबद्ध केले असून, निकालाच्या वेळी तरुण तेजपाल यांनी न्यायालयात वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हे अपील २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या त्या निकालाविरोधात आहे, ज्यामध्ये गोव्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये तहलका आयोजित कार्यक्रमादरम्यान एका कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांतून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
गोवा सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तर तेजपाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT