karnataka High Court 
गोवा

Mother's right to surname | जन्मदाखल्यात मुलीला आईचे आडनाव देण्याचा आईला अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्णय

आईने जन्म प्रमाणपत्रावरून वडिलांचे नाव काढून स्वतःचे आडनाव देण्याची मागणी बंगळूरू महानगर पालिकाकडे केली होती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : जन्म प्रमाणपत्रावर मुलीला आईचे आडनाव देण्याचा अधिकार आईला आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. आईचे आडनाव नोंदवल्याने जैविक वडिलांचे कायदेशीर हक्क वारसा, उत्तराधिकार व पालनपोषण यावर कोणताही परिणाम होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांनी ९ वर्षांच्या मुली व तिच्या आईला दिलेल्या दिलाश्यात सांगितले की, नावातील बदल हा केवळ संगोपनाच्या वास्तव परिस्थितीचे प्रतिबिंब आहे; त्यातून वडील-मुलीतील जैविक व कायदेशीर नाते अबाधित राहते.

प्रकरणात बंगळूरूमधील दोन नेपाळी नागरिकांच्या लिव्ह - इन नात्यातून २०१७ मध्ये मुलीचा जन्म झाला. नंतर वडील नेपाळला परतले. आईने जन्म प्रमाणपत्रावरून वडिलांचे नाव काढून स्वतःचे आडनाव देण्याची मागणी बंगळूरू महानगर पालिकाकडे केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT