Harmal Goa News  
गोवा

Harmal Goa News | फिरत्या विक्रेत्यांचा नाहक त्रास

Harmal Goa News | हणजूण, वागातोर समुद्र किनाऱ्यावर प्रकार वाढले; बंदोबस्ताची मागणी

पुढारी वृत्तसेवा

हणजूण: हणजूण-बागतोर समुद्र किनाऱ्यावर फिरत्या विक्रेत्यांचा व लमाणी महिलांचा उपद्रव वाढलेला असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी पर्यटकांची मागणी आहे. टिकल्या, कंगवे, केसांच्या क्लिपा पिना, माळा, हातात घेऊन विकण्यासारख्या वस्तू व कपडे या लमाणी महिलाकडून व विक्रेत्यांकडून पर्यटकांच्या मागे लागून माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो.

काही लमाणी महिला विदेशी पर्यटकांना मसाजाचे आमिष दाखवतात तर काहीजणी अमलीपदार्थचा छुपा (उपलब्धतेचे ठिकाण दाखवण्याचा) व्यवसाय करतात, असे सांगितले जाते. हणजूण पोलिस व पर्यटक पोलिस यांच्या आशीर्वादाने येथील समुद्रकिनाऱ्यावरील फिरत्या विक्रेते व लमाणी महिलांचा वावर वाढला आहे.

रात्रीच्यावेळी काही फिरते विक्रेते चिनी बनावटीच्या प्रकाशमान होणाऱ्या वस्तू हातात घेऊन फिरत असतात. या फिरत्या विक्रेत्यांचा व लमाणी महिलांचा दाखवण्याचा एक व करण्याचा दुसराच व्यवसाय असावा अशी शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT