Malegaon Water Crisis 
गोवा

Goa State Pollution | राज्यातील पाण्याची गुणवत्ता चिंताजनक

Goa State Pollution | गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पणजीः पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (जीएसपीसीबी) एका अहवालानुसार, एप्रिल २०१५ ते मार्च २०२६ या कालावधीतील बहुतांश काळात राज्यातील हवेची गुणवत्ता चांगली राहिली आहे. मात्र, पाण्याची गुणवत्ता ही चिंतेची बाब असून, समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यासह काही जलस्रोतांमध्ये फेकल कोलिफॉर्मच्या पातळीचे उल्लंघन आढळून आले आहे.

अहवालानुसार, कुंकळ्ळी, तुये, डिचोली, वास्को, वेर्णा आणि कुंडई यांसारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये हवेची गुणवत्ता समाधानकारक ते मध्यम होती. निरीक्षण स्थळांच्या आसपासच्या क्षेत्रीय निरीक्षणातून मानवनिर्मित प्रदूषणाचा प्रादुर्भाव दिसून आला. राज्यात ११४ निरीक्षण केंद्रे असून उत्तर गोव्यात ४९ आणि दक्षिण गोव्यात ६५ आहेत.

पीसीबीच्या नियमांनुसार १०६ ठिकाणांचे मासिक निरीक्षण केले गेले. मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत २०२५-२६ दरम्यान १,२९९ नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख योजनेअंतर्गत, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ संपूर्ण गोव्यातील ११४ ठिकाणी पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करते.

औद्योगिक विहिरींच्या पाण्यात कोलिफॉर्मच्या प्रमाणाबाहेर ३६.३ टक्के वाढ दिसून आली. समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यात किरकोळ समस्या जाणवल्या असे अहवालात म्हटले आहे. निरीक्षणाखाली असलेल्या जलस्रोतांमध्ये नद्या, विहिरी, कालवे, तलाव, जलाशय, ओढे, नाले आणि सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT