Gpay Feature Pudhari
गोवा

Google Pay UPI Circle Myth | पॉकेट मनी फीचर संबंधी 'तो' मेसेज बनावट

Google Pay UPI Circle Myth | समाज माध्यमांमधून नाहक भीती : नवे यूपीआय सर्कल फीचर सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

गूगल पे (जीपे) वरील नव्या ♡ Pocket mo... फीचरच्या आयकॉनसोबत समाजमाध्यमांवर फिरणारा व्हॉईस मेसेज बनावट आहे. 'त्या' आयकॉन वर चुकून क्लिक केल्यास आपले बँक खाते रिकामी होईल, हा नवा स्कॅम आहे, असे सांगणारा मेसेज ही एक अफवा व व्हायरल असत्य आहे. गेले काही दिवस एक ऑडिओ मेसेज फिरतो आहे. त्यासोबत गूगल पे वरील एक पेज व्हायरल होत आहे.

त्यावर एक हातात हात घेतलेला किंवा हार्टच्या आकाराचा आयकॉन आहे. या आयकॉनला चुकून सुद्धा क्लिक करू नका, क्लिक केल्यास आपल्या code transfer UPI Pocket mo. People खात्यातील सगळी रक्कम आपोआप गायब होईल आणि ती पुन्हा मिळवणे कठीण होईल.

हा सायबर स्कॅमचा एक नवा प्रकार असून अनेकांच्या बाबतीत हा फ्रॉड झाला आहे. त्यामुळे सावध राहा आणि इतरांना सावध करा, असा तो ऑडिओ मेसेज आहे. हा मेसेज गोवा व महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरतो आहे. त्यामुळे कुणी त्या खुणेवर क्लिक करीत नाही. मात्र, प्रत्येकजण हे खरे आहे का विचारत आहे.

या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी रायबंदर येथील सायबर विभागाशी संपर्क साधला. सायबरचे पोलिस निरीक्षक विद्यानंद पवार यांनी हा स्कॅम वैगरे काही नाही, तर हे गुगलने लाँच केलेले नवे पॉकेटमनी फीचर आहे, असे सांगितले, सुरक्षिततेसाठी काय करावे? आपल्या गूगल पे ला विश्वासु कॉन्टॅक्ट नंबर जोडावा. त्यांचे नंबर सेव्ह करावा व अनोळखी कुठल्याच अॅपवर क्लिक करू नये.

पॉकेटमनी फीचर काय आहे..?

नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या मदतीने गूगलने यूपीआय सर्कल हे नवे फीचर लाँच केले आहे, जे आपल्याला हार्टच्या आकाराचे दिसते. दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलते आहे, त्यामुळे आपल्यालाही बदलावे लागणार आहे.

हे फीचर कसे चालते..?

सेकंड युजरला क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर फर्स्ट युजरला नोटिफिकेशन येईल. त्यानंतर १० मिनिटांत पेमेंट करावे लागेल. हे पेमेंट यूपीआय पिनने येईल व ट्रान्सेंक्शन झालेले दिसेल.

हे फीचर कशासाठी..?

आपल्या घरातील व्यक्तीकडे, मुलांकडे बैंक खाते नसेल, तरीही ते गूगल पेमेंट करू शकतात. ज्याच्याकडे गूगल पे आहे तो प्रायमरी युजर आहे, तो सेकंड युजरला (मुलगा किंवा कुटुंबातील सदस्य) दरमहा १५ हजार रुपये किंवा प्रत्येक वेळेसाठी पेमेंट करू शकतो. त्यासाठी त्यांना गूगल पे स्कॅन करावा लागेल किंवा यूपीआयवर पेमेंट करावे लागेल. हे व्यवहार एनपीसीआयमुळे सुरक्षित आहेत.

पॉकेटमनी कसे द्यायचे..?

मुलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना पकिटमनी द्यावा लागतो किंवा गरजेप्रमाणे पैसे द्यावे लागतात. त्यासाठी गूगल पे मधील प्रोफाइलवर क्लिक करायचे, यूपीआय सर्कल निवडायचे, ज्याला पैसे द्यायचे त्याचा नंबर सेव्ह करायचा किंवा क्यू आर कोड द्यावा. त्यानंतर अॅप्रूव्ह एव्हरी पेमेंट किंवा सेट मंथली लिमिट हा पर्याय निवडावा, त्यानंतर होणारे पेमेंट एनपीसीआयमुळे सुरक्षित असणार आहे. त्यामुळे या आयकॉनवर क्लिक केल्यास खाते रिकामी होईल, हा नवा स्कॅम आहे वगैरे केवळ अफवा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT