गोवा

37th National Games : गोव्याच्या शुभम वर्माला वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक

backup backup

पणजी; पुढारी वृत्तसेवा : सनतकुमार फडते वेटलिफ्टींगमध्ये गोवा संघाच्या शुभम वर्मा यांनी दुसरा क्रमांक मिळवित रौप्य पदक जिंकले असून गोव्याचे खाते वेटलिफ्टींग गटात उघडुन दिले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांपाल गेम्स व्हीलेज येथे पुरुषांच्या वेटलिफ्टींगमध्ये १०२ किलो गटात वर्मा यांनी गोव्याला हा बहुमान मिळवून दिला आहे. या प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या कोजुम ताबा यांनी सुवर्णपदक जिंकले तर आसाम संघाचे महम्मद जमीर हुसेन यांनी तृतीय क्रमांकावर येत कांस्यपदक पटकाविले. शुभम वर्मा यांनी एकूण ३२६ किलो वजन उचलले तर हुसेन एकूण ३२५ किलो वजन उचलू शकले. वर्मा यांनी पहिल्या स्नेच प्रकारात १३८ किलो वजन उचलले आणि दुसऱ्या फेरीत यशस्वीरित्या १४३ किलोचे आव्हान पार केले. क्लीन अँड जर्क फेरीच्या आधी १४६ किलो गट प्रकारात मात्र ते अपयशी ठरले. १४६ किलो गटात ते अपयशी ठरल्याने थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी १८३ किलो वजन उचलून एकदम दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. नंतर त्यांनी अजून पुढे जात १८८ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने यशस्वी झाले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT