Goa Weather Forecast (file photo)
गोवा

Goa Weather Forecast | गोव्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचे!; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather Forecast | हवामान विभागाचा 'यलो अलर्ट' ; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा हवामान विभागाने उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांसाठी आगामी सात दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, दि. २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवार, दि. २१ ते २३ या तीन दिवसांत उत्तर व दक्षिण गोव्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. दि. २४ ते २६ सप्टेंबर या काळात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम असली तरी हवामानाबाबत कोणताही धोका किंवा इशारा देण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT