Goa Politics 
गोवा

Goa Election news| गोव्यातील १ लाख २७ हजार ४६८ मतदारांची नावे वगळली ! पणजीतील ४२७४ जणांचे शेवटचे मतदान

राज्यात एकूण १० लाख ५७ हजार ५६६ इतकेच मतदार; राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल ,

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : मतदार पडताळणी तथा एस आय आर नंतर गोव्यातील १ लाख २७ हजार ४६८ मतदारांची नावे विविध कारणामुळे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर गोव्यात १० लाख ५७ हजार ५६६ मतदार बाकी असल्याची माहिती गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पणजी महापालिकेसाठी जुन्या मतदार यादीद्वारे मतदान होणार आहे. मात्र एस.आय.आर.नंतर पणजी मतदार संघातील ४ हजार २७४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पणजी महापालिकेसाठी मतदान करणाऱ्या ४,२७४ जणांचे हे गोव्यातील शेवटचे मतदान ठरु शकते.

गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी शनिवारी (दि.२१ फेब्रुवारी) पणजी येथे आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. चार महिन्याच्या एसआयआर मतदार पडताळणीनंतर ही नवी यादी जारी करण्यात आली. जे मतदार पत्त्यावर सापडले नाहीत त्यांना नोटीसही पाठवल्या गेल्या ज्यानी तिला उत्तर दिले. तसेच योग्य ती कागदपत्रे सादर केली त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली.

२७ आक्टोबर २०२५ च्या यादीत 11 लाख 85 हजार 034 मतदार होते. अशी माहिती गोयल यांनी दिली .राज्यातील सर्वात जास्त मतदार वगळलेला मतदार संघ वास्को असून येथील ११ हजार ६५७ मतदार वगळले गेले आहेत. गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट असलेले १६ हजार ७२१ मतदार आहेत. त्यातील ४२० जनांकडे पोर्तुगीज नारगीकत्व सापडले त्यामुळे त्यांची नावे वगळली असे गोयल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT