पणजी; पुढारी वृत्तसेवा : वास्को येथे असलेल्या नौदल हवाई यार्ड इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहेत.
ही इमारत जुनी असल्याने स्लॅब कोसळला असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये खेमकांत नाईक (मडकई) यांचा जागीच मृत्यू झाला, तर साईप्रसाद महाले व बाबासाहेब सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.