Worms In Tap Water 2026  
गोवा

Worms In Tap Water 2026 | सत्तरी तालुक्यात नळाच्या पाण्यात अळीसदृश्य जंतू; दोन महिन्यांत तिसरी घटना घडल्याने नागरिकांचा तीव्र संताप

Worms In Tap Water 2026 | दोन महिन्यांत तिसऱ्यांदा नळाच्या पाण्यात आढळले अळीसदृश जंतू

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील पिण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गेल्या दोन महिन्यांत नळाच्या पाण्यात अळीसदृश्य जंतू आढळण्याच्या तब्बल तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सतत घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

सत्तरी तालुक्यातील सुमारे ६० टक्के भागाला दाबोस जलशुद्धीकरण प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पाण्याचा पुरव पुरवठा केला जातो. या प्रकल्पातून जलवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्याद्वारे पाणी विविध भागांत पोहोचवले जाते.

मात्र या जलवाहिन्यांची देखभाल, गळती नियंत्रण आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी याबाबत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी वाळपई नगरपालिका क्षेत्रातील एका घरात नळाच्या पाण्यात अळीसदृश्य जंतू आढळून आला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी झर्ने गावातही अशीच घटना घडली.

दोन्ही प्रसंगी संबंधित जलवाहिन्या फ्लश करून स्वच्छ करण्यात आल्या होत्या, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या एका घरात नळाच्या पाण्यात अळीसदृश्य जंतू आढळून आल्याने तिसरी घटना समोर आली आहे.

या घटनांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी स्पष्टपणे समोर येत असून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या तिन्ही घटना वेगवेगळ्या भागांत घडल्याने ही समस्या स्थानिक नसून संपूर्ण व्यवस्थेतील असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्या पाइपलाइन, जलवाहिन्यांतील गळती, दुरुस्तीवेळी घेतली जाणारी हलगर्जी आणि पाण्याच्या तपासणीतील प अपुरेपणा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.

पिण्याच्या पाण्यात वारंवार जंतू क आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून अ त्यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अधिक धोक्यात येण्याची शक्यता fa असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे क वातावरण आहे. केवळ तात्पुरते उपाय न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.

आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा...

आमदार डॉ. देविया राणे तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी, दोष निश्चित करावेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT