Used Cooking Oil Policy AI Image
गोवा

Goa Used Cooking Oil | वापरलेल्या खाद्य तेलाची डिजिटल नोंदणी अनिवार्य

Goa Used Cooking Oil | गोव्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, कॅन्टीन, अन्न प्रक्रिया युनिट्स आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसह सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी आता त्यांच्या वापरलेल्या खाद्यतेलाचा (युसीओ) तपशील राज्य-संचालित डिजिटल पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, कॅन्टीन, अन्न प्रक्रिया युनिट्स आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसह सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी आता त्यांच्या वापरलेल्या खाद्यतेलाचा (युसीओ) तपशील राज्य-संचालित डिजिटल पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे.

कारण सरकारने वापरलेल्या खाद्यतेलाच्या व्यवस्थापनासाठी आपले धोरण लागू केले आहे. पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने मंगळवारी सर्व खाद्य व्यावसायिकांना व्यवहाराचा डेटा सादर करण्यासाठी गोवा ऊर्जा विकास एजन्सी (जीईडीए- गेडा) ने विकसित केलेले ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरण्याचे निर्देश दिले.

या अनिवार्य प्रणालीअंतर्गत, व्यावसायिकांनी वापरलेल्या तेलाची निर्मिती, संकलन, साठवण, वाहतूक, हस्तांतरण आणि विल्हेवाट यावरील आकडेवारीची नोंद करणे आवश्यक आहे. पर्यावरण खात्याच्या मते, हे पोर्टल खाद्य व्यवसाय, संकलन एजन्सी आणि अधिकृत जैवइंधन प्रकल्पांना जोडेल.

ज्यामुळे संपूर्ण शोधक्षमता, पारदर्शकता आणि प्रभावी पुरवठा साखळी देखरेख सुनिश्चित होईल. गेडाने पोर्टल चालवण्यासाठी बायोफ्युएल सर्कल प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. ही कंपनी यूसीओ जनरेटरना सामील करून घेईल आणि फूड ऑपरेटर, एग्रीगेटर, वाहतूकदार आणि अधिकृत बायोफ्युएल उत्पादकांमध्ये समन्वय साधेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT