गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची कार बुधवारी झुआरी पुलाच्या कठड्याला आदळली होती.  Pudhari photo
गोवा

Goa Tribal Vision | उतोर्डा येथे आज 'गोवा ट्रायबल व्हिजन 2037' परिषद

Goa Tribal Vision | या परिषदेत राज्याच्या आदिवासी विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी विविध तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 'गोवा ट्रायबल व्हिजन २०३७' या विषयावर एकदिवसीय परिषद बुधवारी, २२ जुलैला प्लॅनेट हॉलीवूड बीच रिसॉर्ट, उतोर्डा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत राज्याच्या आदिवासी विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी विविध तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

सकाळच्या सत्रात १० वा. परिषदेचे उद्घाटन आदिवासी कल्याण मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या स्वागतपर भाषणाने होईल. उद्घाटन समारंभाला आमदार गोविंद गावडे, आमदार डॉ. गणेश गावकर उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सकाळी ११.३० वा. बिट्स पिलानी गोवा कॅम्पस येथील मानवविद्या व सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रमेश चेरुवाल्लथ यांचे प्रमुख सादरीकरण होईल. तसेच आदिवासी समाजाच्या प्राधान्यक्रमांचे मॅपिंग, विविध क्षेत्रांतील आव्हाने आणि विकासाच्या संधींवर विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

दुपारच्या सत्रात आदिवासी कल्याण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर गटचर्चा, आंतरविभागीय समन्वय, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तर सत्र होईल. समारोप सत्रात माजी मंत्री व एसटी नेते प्रकाश वेळीप, गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गावकर तसेच कुठ्ठाळी आमदार अँतोन वाझ यांची समारोपपर भाषणे होणार असून, आभार प्रदर्शनानंतर परिषदेची सांगता होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT