Minister Mauvin Godinho 
गोवा

Minister Mauvin Godinho | राज्यातील पारंपरिक पायलट सेवा कात टाकतेय

Minister Mauvin Godinho | माझे अॅप, पार्सल, फूड डिलिव्हरीतून डिजिटल क्षेत्रात करणार प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी गोव्यातील पारंपरिक मोटरसायकल टॅक्सी अर्थात पायलट सेवा आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणार आहे. 'माझे अॅप'च्या माध्यमातून प्रवाशांना थेट पायलट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर पायलट चालकांना टप्प्याटप्प्याने विजेवरील दुचाक्याही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गोवा मोटारसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशन आणि ग्रेटफुल गोवा सुपर अॅप प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी ही माहिती दिली.

राज्यात गेली अनेक दशके पायलट सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची वाहतूक व्यवस्था ठरली असली, तरी अॅप-आधारित टॅक्सी सेवा, वाढते इंधन दर आणि मोटारसायकलींच्या देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे पायलट चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक संचालक अरविंद खुटकर, सचिव कुमार शंभू, सहसंचालक सावंत, राजेश नाईक कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, माझे अॅपचे संचालक रामजुल तिमोदी, रेबीका लोबो आदी उपस्थित असतील. यावेळी पायलटांच्या प्रलंबित मागण्या आणि मासिक अर्थसहाय्य व अन्य योजनांवर विचार विनिमय होणार आहे.

पार्सल, कुरिअर, फूड डिलिव्हरी सेवाही पुरविणार

स्थानिक नागरिकांसह देशी-विदेशी पर्यटकांनाही काही क्षणांत जवळचा पायलट उपलब्ध होणार आहे. प्रवासी सेवेबरोबरच पार्सल डिलिव्हरी, कुरिअर सेवा, फूड डिलिव्हरी अशा विविध सेवा पुरविण्याची संधी पायलट चालकांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT