Murud Beach Tourism Pudhari
गोवा

Goa Parasailing | राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पॅरासेलिंगची कोणतीही दुर्घटना नाही

Goa Parasailing | पोलिस, पर्यटन विभागा-कडून 'त्या' वृत्ताचा इन्कार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रसारमाध्यमांच्या काही विभा- गांकडून प्रसारित झालेले, एका समुद्रकि-नाऱ्यावर पॅरासेलिंग करताना एक दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त पर्यटन विभाग आणि पोलिसांनी नाकारले आहे. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना २०१९ सालची असून ती राज्याच्या हद्दीत घडलेली नाही.

सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर येऊन व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले. गोवा पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आवाहन केले आहे. की, योग्य तथ्य, तपासणी न करता पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करू शकणाऱ्या, पडताळणी न झालेल्या वृत्तांवर विश्वास ठेवणे किंवा ती इतरांना सांगणे टाळावे.

गोवा पर्यटन विभाग, कठोर स्थानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आणि मोसमी सागरी परिस्थितीचा आदर राखून, आपले समुद्रकिनारे सर्व पर्यट-कांसाठी सुरक्षित राहतील याची खात्री करत आहे.

गुन्हेगारी कमी करणे आणि सार्वजनिक शिस्त सुनिश्चित करणे या उद्देशाने विभागाने 'सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारे' या मोहिमेसह सर्वसमा-वेशक सुरक्षा नियमावली लागू केली आहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सुष्मिता गौरव नावाच्या पर्यटक महिलेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली गेल्याने श्वास कोंडल्याचा आणि पाण्यात कोसळल्याचा दावा करण्यात आला होता.

चौकशी सुरू

सुरुवातीला हा व्हिडिओ गोव्यातील मानला जात होता, मात्र नंतर पर्यटन विभागाने स्पष्ट केले की, हा व्हिडिओ गोव्यातील नसून तो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग परिसरातील असू शकतो, त्याची चौकशी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT