AI Cameras Security Pudhari
गोवा

Goa AI Traffic Cameras | गोव्यात ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही! 68 ठिकाणी बसणार 701 नवे एआय कॅमेरे

Goa AI Traffic Cameras | गोव्यात वाहतूक नियमभंगावर एआयची नजर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारकडून ६८ महत्त्वाच्या ठिकाणी ७०१ नवीन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सध्या राज्यात २६ ठिकाणी ३४८ एआय कॅमेरे कार्यरत असून, नव्या कॅमेऱ्यांमुळे राज्यातील एआय आधारित वाहतूक निरीक्षण यंत्रणेचा विस्तार एक हजारांहून अधिक कॅमेऱ्यांपर्यंत होणार आहे.

वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन प्रत्येक चौकात ४ ते १५ कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. नागोवा जंक्शन आणि आल्त बेटी-परवरी येथे प्रत्येकी १५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ओ कोकेरो सर्कल, एमईएस जंक्शन आणि दाबोळी येथील व्हॅलेस जंक्शन येथे प्रत्येकी १४ कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे.

पर्यटक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या कळंगुट, बागा, कांदोळी, म्हापसा, हणजूण आणि साळगाव या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅमेरे बसविले जाणार आहेत. या भागातील काही ठिकाणी १२ पर्यंत एआय कॅमेरे बसविण्यात येतील.

२६ ठिकाणी १०.४१ लाख नियमभंगांची नोंद:

वाहतूक खात्याच्या आकडेवारीनुसार, सध्या कार्यरत असलेल्या २६ ठिकाणाच्या एआय कॅमेऱ्यांनी आतापर्यंत १० लाख ४१ हजार ९५८ वाहतूक नियमभंग नोंदविले आहेत. त्यापैकी ५,६८४ ई-चलन जारी करण्यात आले असून ८१ कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT