Vishwajeet Rane File Photo
गोवा

Goa First Digital Health | गोवा देशातील पहिले डिजिटल आरोग्य राज्य होण्याच्या दिशेने

Goa First Digital Health | मंत्री विश्वजित राणे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा देशातील पहिले पूर्णतः डिजिटल आरोग्य राज्य बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी बांबोळी येथे जागतिक डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

कार्यक्रमापूर्वी त्यांनी धारबंदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात इकोकार्डिओग्राफी केंद्राचे उद्घाटन केले. राणे म्हणाले, प्रतिबंधात्मक आरोग्य, लवकर निदान आणि वेळेवर उपचार यावर सरकारचा भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ, जलद आणि रुग्णकेंद्रित होत असून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा सरकारचा संकल्प आहे.

राज्यात १० लाख आभा कार्ड नोंद

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, गोवा आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत राणे यांनी सांगितले की, राज्यात जवळपास १० लाख आभा आयडी तयार झाले असून सार्वजनिक आरोग्य संस्थांची १०० टक्के डिजिटल नोंदणी पूर्ण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT