पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या, मध्य प्रदेशातील आणि खोल अंतर्भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याचे कमी झालेले तापमान आता वाढत आहे. पणजी शहरातील पारा काही दिवसांत १.५ अंशांनी वाढून रविवारी १९ अंश सेल्सिअस झाला असला तरी थंडी कायम आहे.
गुरुवारी पणजीमध्ये या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सौम्य हिवाळी हंगामाच्या शिखरावर असताना हे तापमान सामान्यपेक्षा जवळजवळ चार अंशांनी कमी होते. शुक्रवारी, पारा १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला, जरी तो सामान्यपेक्षा जवळजवळ तीन अंश कमी होता.
रविवारी व सोमवारी सकाळचे तापमान असेच होते. भारतीय हवामान विभाग पणजीने दिलेल्या माहितीनुसार पणजी व मुरगावमध्ये सोनवारी कमाल तापमान ३३.६ नोंद झाले. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पणजीमध्ये पुढील काही तासांत किमान तापमान १८ ते अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरचे काही दिवस २० ते अंश सेल्सिअस तापमान राहील. काही वर्षांनंतर पहिल्यांदाच, राज्यात थंडीचा कडाका दीर्घकाळ टिकून आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
1945 मध्ये सर्वात कमी तापमान...
११ नोव्हेंबर २०१३ रोजी पणजीमध्ये सर्वात कमी तापमान १६.८ अंश नोंदवले गेले. डिसेंबरमध्ये १६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यापूर्वी १४ डिसेंबर १९४५ रोजी पणजीमध्ये किमान १४.१ अंश तापमानाची नोंद झाली. हे आजवरील सर्वात कमी तापमान आहे.