Jennifer Monserrate Passes Away 
गोवा

Jennifer Monserrate Passes Away | जेनिफर मोन्सेरात यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली

Jennifer Monserrate Passes Away | ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे कर्करोगाने निधन; विविध राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

ताळगाव मतदारसंघाच्या आमदार जेनिफर मोन्सेरात (वय ५६) यांचे रविवारी (दि. १९) कर्करोगाने दोनापावल येथील खासगी इस्पितळात निधन झाले. त्यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे की, आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या अकाली निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. आज गोव्याने एक दयाळू लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेली एक महिला गमावली आहे. त्यांचा स्नेह, कणखरपणा आणि आपल्या मतदारसंघाप्रती असलेली अढळ निष्ठा सदैव स्मरणात राहील.

राज्यसभा खासदार सदानंद शेत तानावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, ताळगावच्या आमदार आणि माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे.

लोकसेवेसाठी त्यांनी केलेल्या समर्पित कार्याबद्दल त्या सदैव स्मरणात राहतील. मोन्सेरात कुटुंबाला आणि त्यांच्या सर्व प्रियजनांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. हे कधीही भरून न येणारे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देओ आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांचे पती, पणजीचे आमदार बाबुल मोन्सेरात आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, त्यांची लोकसेवेप्रती असलेली निष्ठा आणि गोव्याच्या जनतेप्रती असलेली त्यांची अढळ वचनबद्धता आदर आणि कृतज्ञता स्मरणात राहील. त्यांनी सेवेचा एक चिरस्थायी वारसा मागे ठेवला आहे. या दुःखात असलेल्या त्यांच्या कुटुंबाला मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक म्हणाले, ताळगावच्या पहिल्या महिला आमदार, तसेच तीनवेळा सलग आमदार झालेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी गोमंतकीय जनतेची सेवा केली. त्यांच्या कुटुंबाला दुःख पेलण्याची शक्ती लाभो, अशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT