पणजी : सरकारच्या गृह खात्याने पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल केले आहेत. दोन निरीक्षक, 34 उपनिरीक्षक आणि इतर मिळून एकूण 565 पोलिस कर्मचार्यांच्या बदल्या केल्या असून, यातील 60 जणांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
पोलिस खात्यात नुकतीच भरती झालेल्या 859 पोलिसांची विविध पोलिस स्थानकांत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता वाढणार आहे. याबरोबरच राज्य गृहमंत्रालयाने सहायक पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 27 आणि हेड कॉन्स्टेबल (चालक) पदासाठी 55, अशा एकूण 82 नव्या पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. या बदलांमुळे पोलीस खात्याचे काम अधिक गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.