पणजी : गोवा कर्मचारी निवड आयोगाने विविध सरकारी विभागांतील २१५ गट 'क' पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २ ऑक्टोबर आहे.
या भरतीमध्ये १९७ कनिष्ट कारकून (एलडीसी) तथा वसुली कारकून (रिकव्हरी क्लर्क), १३ कनिष्ठ सहाय्यक (ज्युनियर असिस्टंट), ३ डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आणि २ डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांचा समावेश आहे.
१९७ एलडीसी/रिकव्हरी क्लर्क पदांपैकी २३ पदे दिव्यांग व्यक्तींसाठी, १७ पदे माजी सैनिकांसाठी आणि एक पद गुणवंत खेळाडूसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच, १३ कनिष्ठ सहाय्यक पदांपैकी तीन पदे दिव्यांग व्यक्तींसाठी आणि एक पद माजी सैनिकांसाठी राखीव आहे.