गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची कार बुधवारी झुआरी पुलाच्या कठड्याला आदळली होती.  Pudhari photo
गोवा

Goa ST Reservation | एसटी आरक्षणाविषयी 15 दिवसांत केंद्र सरकार भूमिका स्पष्ट करणार; आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

Goa ST Reservation | आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एसटीला आरक्षण देणे शक्य आहे की नाही, याविषयी केंद्र सरकार १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहे. सॉलिसीटर आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आरक्षणाच्या कार्यवाहीविषयी निर्णय कळवतो, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

इतर समाजासारखाच धनगर समाजाचाही एसटीत रमेश तवडकर जनरलाकडे चर्चा करून समावेश होणे गरजेचे असल्याचे तवडकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ७ जून रोजी गोव्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. येत्या विधानसभेत एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती.

याविषयी बोलताना मंत्री रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, एसटी आरक्षणाचा कायदा संसदेत संमत झाला आहे. त्यामुळे इतर समाजाला पुढे काढून एसटी आरक्षणाला विरोध करणे अयोग्य आहे. कायदा झाल्याने एसटी आरक्षणाची कार्यवाही होणारच, असे तवडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT