Lt Gen Sumer D'Cunha  
गोवा

Lt Gen Sumer D'Cunha | गोव्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल सुमेर डिकुन्हा यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान

Lt Gen Sumer D'Cunha | गोव्यातील कुडतरी येथील सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स दलातील लेफ्टनंट जनरल सुमेर इव्हान डिकुन्हा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील कुडतरी येथील सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स दलातील लेफ्टनंट जनरल सुमेर इव्हान डिकुन्हा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवन येथे सोमवारी झालेल्या डिफेन्स इन्व्हेस्टिचर समारंभ २०२६ (दुसरा टप्पा) दरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला. समारंभात राष्ट्रपतींनी भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी व जवानांना एकूण १०५ विशिष्ट सेवा पदके प्रदान केली. लेफ्टनंट जनरल सुमेर इव्हान डिकुन्हा यांच्या या सन्मानामुळे गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT