Smart Meter Protest Pudhari
गोवा

Smart Electricity Meter | गोव्याचा वीज पुरवठा होणार 'स्मार्ट'! आतापर्यंत 1 लाख मीटर बसवले; सुदिन ढवळीकर यांची माहिती

Smart Electricity Meter | योजना विहित मुदतीत होईल पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात आतापर्यंत सुमारे १ लाख स्मार्ट वीज मीटर्स बसवण्यात आले आहेत. तसेच, संपूर्ण राज्यात ही योजना विहित मुदतीत अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. स्मार्ट मीटर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

देशभरात स्मार्ट मीटर्स बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राने मार्च २०२८ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. सुदिन ढवळीकर पूर्ण केली जाईल, चांगल्या कामाला नेहमीच काही प्रमाणात विरोध होत असतो, असे स्पष्ट करत मंत्री ढवळीकर म्हणाले की, ग्राहकांसाठी 'प्रीपेड' आणि 'पोस्टपेड' असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

तसेच, केंद्र सरकारच्या निर्दे-शानुसार सर्व राज्यांसाठी स्मार्ट मीटर्स बसवणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, वीज खात्याने सार्वजनिक सूचना जारी करून ग्राहकांना राज्यात स्मार्ट वीज मीटर्स बसवण्याच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या नवीन प्रणालीमुळे वीज वापराची अद्ययावत माहिती (रिअल टाईम बिलिंग डेटा) उपलब्ध होईल आणि विजेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे शक्य होईल, असे सूचनेत म्हटले आहे.

जेईआरसी आणि केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या मीटर्सच्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचे काम डिजीस्मार्ट नेटवर्क प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीमार्फत केले जात आहे. मीटर बदलून घेण्यापूर्वी, संबंधित कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासून घेण्याचा सल्ला ग्राहकांना देण्यात आला आहे.

गोव्यात ७.५ लाख स्मार्ट प्रीपेड वीज मीटर्स टप्प्याटप्प्याने बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या प्रामुख्याने सरकारी कार्यालये आणि औद्योगिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, लवकरच ही योजना घरगुती आणि इतर ग्राहकांपर्यंतही विस्तारली जाण्याची अपेक्षा आहे. देशभरात स्मार्ट मीटर्स बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राने मार्च २०२८ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT