shops hotels malls now open 24 hours in state Pudhari
गोवा

Goa News | केंद्राच्या निर्देशानुसार गोव्यातील दुकाने, मॉल्स २४ तास खुले राहणार

कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Goa Shops Open 24 Hours

पणजी : राज्यातील दुकाने व मॉल्सना आठवड्यातील सर्व दिवस २४ तास खुले ठेवण्याची परवानगी केंद्राच्या निर्देशानुसार देण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे.

गोवा सरकारने राज्यातील दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्सना आठवड्यातील २४ तास चालवण्याची परवानगी दिली आहे. तशी अधिसूचना सरकारने काढली आहे. १६ नोव्हेंबरपासून तात्काळ लागू झालेला हा आदेश, गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगार आणि सेवा शर्तींचे नियमन) अधिनियम, २०२५ (गोवा अधिनियम २३, २०२५) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व व्यावसायिक आस्थापनांना लागू होतो.

या कायद्यामुळे राज्याला जनहितार्थ उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेचे नियमन करण्याचे अधिकार मिळतात, ही परवानगी मुदतपूर्व रद्द न केल्यास तीन वर्षांसाठी वैध राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची आणि गोव्याच्या वाढत्या किरकोळ क्षेत्राला आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

याबाबत पर्वरी येथे बुधवारी मोन्सेरात यांनी सांगितले की, केंद्रीय कॅबिनेट सचिवांची गोवा कामगार खात्याला पाठवलेल्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने सेवा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने चोवीस तास कामकाज सुरू केले आहे. २०२५ मध्ये, रेस्टॉरंट आणि खानावळींना रात्रभर उघडे राहण्याची परवानगी देण्यात आली. महिलांना कारखान्यांमध्ये रात्रीच्या पाळीत काम करण्याची परवानगी देण्यात आली होती, असेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT