CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | महिलांना मिळणार आर्थिक स्वावलंबनाची संधी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

CM Pramod Sawant | नोकरी हवी की स्वतःचा व्यवसाय? गोव्यातील युवक-महिलांसाठी सरकारचा खास उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
स्वयंपूर्ण व विकसित गोव्याचे ध्येय साध्य करण्यासाठी युवक व महिलांना कुशलता प्रशिक्षण दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दोनापावला येथे बुधवारी लोकभवन सभागृहात आयोजित स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, आर्थिक साहाय्य आणि उद्योजकतेद्वारे गोव्यातील महिला आणि युवकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने स्वयंपूर्ण कौशल्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. येत्या काळात १६ सरकारी खात्याअंतर्गत ६० योजनांच्या माध्यमातून, युवा व महिलांना कृषी, मत्स्य व्यवसाय,

पशुपालन, पर्यटन, आरोग्य सेवा, किरकोळ विक्री आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यासाठीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. हा मेळावा २४ एजन्सीमार्फत उद्योग-केंद्रित प्रशिक्षण अभ्यासक्रम, तसेच शिकाऊ उमेदवारीच्या संधी, आर्थिक साहाय्य आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शनदेखील प्रदान करतो, असे त्यांनी नमूद केले.

नारी शक्ती, युवा शक्तीला प्राधान्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, मी युवांना व महिलांना विशेषतः १८ ते ५० वयोगटातील महिलांना, यात सहभागी होण्यासाठी, या संधींचा शोध घेण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.

जेव्हा एखादी स्त्री आत्मनिर्भर होते, तेव्हा ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम बनवते. नारी शक्ती, युवा शक्ती आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून, आम्ही स्वयंपूर्ण गोवा आणि विकसित गोवा २०३७ या आमच्या दूरदृष्टीच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT