अमानाथ पणजीकर 
गोवा

Goa - राज्यात प्रतिदिन सात रस्ते अपघात, रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

Goa road accidents rental vehicles- रेंट-ए-कार व बाईक; भाडेतत्त्वावरील वाहनांमुळे रस्ते 'मृत्यूचे सापळे'

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्यात भाडेतत्त्वावरील रेट-ए-कार आणि रेंट ए बाईकच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाडेतत्त्वावरील वाहन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात भाजप रास्कार अपयशी ठरलो असून, गोव्याचे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.

राज्यभर कार्यरत असलेल्या रेंट ए कार व रेंट ए बाईक व्यवसायावर प्रभावी नियंत्रण व देखरेख करण्यात सरकार अपयशी ठरल्याने अनेक निष्याप नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असे काँग्रेसचे सोशल मिडीया प्रक्ते अमरनाथ पणजीकर यांनी मत व्यक्त केले.

सध्याची वाहन भाड्याने देण्याची पद्धत अत्यंत असुरक्षित बनली आहे. वाहन भाड्याने देताना केवळ वैध ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केली आते, माध्य अनेक वेळा प्रत्यक्ष वाहन चालवणारी व्यक्ती ही परवान्याविना, अपुरी वाहनचालक कौशल्य असलेली किंवा वाहतूक नियमांची माहिती नसलेली असाल्याचे आढळते. या निष्काळजीपणामुळे राज्यातील सस्ते धोकादायक बनल्याचा दावा त्यांनी केला.

वाहतूकमंत्री मादिन मुदिन्होंो आणि खात्याच्या अधिकाऱ्यांवरही निशाणा साधत, वाढत्या अपघातांनंतरही सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. सरकारचे प्राधान्य जनतेची सुरक्षा नसून हितसंबंध जपणे आणि 'मिशन टोटल कमिशन' राबवणे आहे, असा आरोप त्यांनी केला. भाडेतत्त्वावरील वाहन वावसायासाठी कड़वा पडताळणी यंत्रणा, डिजिटल ट्रैकिंग आणि जबाबदारी निश्चित करणारे निकष निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले, असा आरोप त्यांनी केला.

चार महिन्यांत ८५१ प्रकरणे नोंद : चालकांच्या मृत्यूतही वाढ

गोव्यात २०२६ व्या पहिल्या चार महिन्यांत ८५१ रस्ता अपघातांची नोंद झाली असून प्रतिदिन सरासरी ७ अपघात झाले आहेत. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक आहे. रस्ते अपघातांमध्ये कार चालकांच्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत कार वालकांच्या मृत्यूंमध्ये तब्बल ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत केवळ एका चालकाचा मृत्यू झाला होता. मात्र, २०२६ मध्ये याच कालावधीत महा चालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूंमध्येही वाढ झाली असून, यंदा एप्रिलअखेरपर्यंत ५९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, पादचाऱ्यांच्या मृत्यूंमध्ये घट झाली असून २०२५ मधील १५ मृत्यूंच्या तुलनेत यंदा हा आकडा सहावर आला आहे.

राज्यात एप्रिलअखेरपर्यंत ८५१ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याव कालावधीत हा आकडा ७२७ होता. म्हणजेच अपघातांच्या संख्येत ५४ प्रकरणांची वाढ झाली आहे. गंभीर अपघातांची संख्या देखील ८५ वर पोहोचली आहे. वाहतूक पोलिसांच्या विभागाच्या माहितीनुसार, २०२६ च्या एप्रिल महिन्यात एकट्या २३ प्राणघातक अपघातांची नोंद झाली. पर्यटन हंगामात वाढलेली वाहतूक आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत झालेली घट ही अपघात वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे.

रेंट-अ-कार व्यवसाय बंद करा : फळदेसाई

पणजी: राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या रेंट अ कार व्यवसायामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था धोक्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अनुभव नसलेले, वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच बेफाम वेगाने वाहन चालवणाऱ्या पर्यटकांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अरुंद रस्ते, पर्यटन हंगामातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगामुळे स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास कराया लागत आहे.

काही पर्यटक महाप्राशन करून वाहन चालवतात, चुकीच्या दिशेने वाहन चालवतात तसेच वाहतुतिच्या नियमांचे उघड उल्लंघन करतात, याचा मोठा त्रास विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोज कामासाठी प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT