पणजी : वादळी वाऱ्यासह राज्यात सत्तरी, साखळी, डिचोली, सांगे, केपे, धारबांदोडा या तालुक्यांच्या काही भागात पाऊस कोसळला. शुक्रवारीही पुन्हा त्याच भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, प्रमाण थोडे कमी होते. ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काही भागांत झाडांची पडझडही झाली.
सायंकाळी पाऊस व दिवसा बराच उकाडा जाणवत आहे. दोन दिवस गोव्यात तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त नोंदवले गेले आहे. म्हापसा येथे ३४.७ अंश सेल्सिअस आणि पणजी येथे ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने शनिवारपासून आकाश मोठ्या प्रमाणात निरभ्र होण्याचा अंदाज वर्तवला आहे.