Goa Railway Police  
गोवा

Goa Railway Police | गोव्यात घुसखोरांविरोधात पोलिसांचा 'विळखा'! रेल्वे आणि बस स्थानकांवर बांगलादेशी नागरिकांची धरपकड मोहीम सुरू

Goa Railway Police | संवेदनशील भागात पोलिसांची गस्त तीव्र; बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याविरोधात गोव्यात मोठी नाकेबंदी

पुढारी वृत्तसेवा

पणजीः पुढारी वृत्तसेवा

राज्यात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात गोवा रेल्वे पोलिसांनी व्यापक तपासणी मोहीम सुरू केली असून, प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

मडगाव, थिवी, काणकोण, वास्को तसेच उत्तर गोव्यातील काही बस स्थानकांवर ही रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांकडून संयुक्त तपासणी केली जात आहे. रेल्वे मार्गाचा वापर करून राज्यात प्रवेश करणाऱ्या संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांची ओळखपत्रे, प्रवासाची कागदपत्रे आणि राहण्याचा तपशील तपासला जात आहे.

पोलिसांनी काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवत संशयितांची चौकशी सुरू केली आहे. अवैध घुसखोरी, बनावट कागदपत्रांचा वापर आणि संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील संवेदनशील भाग, कामगार वसाहती आणि भाडेकरूंची माहितीही स्थानिक पोलिसांकडून पडताळली जात आहे.

दरम्यान, रेल्वे स्थानकांवरील देखरेख सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे बाढविण्यात आली असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परदेशी नागरिक कायद्यांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT