पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या कथित बेकायदेशीर कारभाराशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोवा आणि दिल्ली येथे एकूण ८ ते ९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे. या कारवाईत क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा, भागीदार अजय गुप्ता, माजी सरपंच रोशन रेडकर व माजी सचिव रघुवीर बागकर याचा समावेश आहे.अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने लुथरा बंधूंच्या दिल्लीतील किस्वे कॅम्प तसेच गुरुग्राममधील निवासस्थानांवर नजर ठेवून आहेत. सध्या पोलिसांची अटक चुकवत
क्लबच्या बेकायदेशीर कार्यप्रणालीतून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि संभाव्य मनी लाँडरिंगचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. छाप्यांदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची तपासणी करण्यात येणार आहे.
खाजन जमिनीचे बेकायदा रुपांतर करण्यात आले, त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचा ईडीचा संशय आहे. ईडीने घातलेल्या या छापेमारीमध्ये निवासस्थाने तसेच कार्यालयातून अनेक संशयास्पद दस्तावेज जप्त केला आहे. त्यामध्ये अधिक जमीन मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यांच्या तसेच कुटुंबाच्या नावावरील बँक खाती तसेच उद्योजकाच्या बैंक खात्यांचाही शोध घेतला आहे. त्यावरील झालेले व्यवहाराची नोंद घेत पुरावे जमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या छापेमारीनंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिल्लीतील ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने लुथरा बंधूंच्या दिल्लीतील किस्वे कॅम्प तसेच गुरुग्राममधील निवासस्थानांवर नजर ठेवून आहेत. सध्या पोलिसांची अटक चुकवत असलेला जमिनीचा मूळ मालक सुरिंदर खोसला याच्याही मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत.
ही कारवाई पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी बर्च क्लवमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर क्लबच्या परवानग्या, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील संभाव्य संगनमताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) हा तपास सुरू केला आहे. माजी सरपंच रोशन रेडकर याने पदाचा गैरवापर करून या नाईट क्लबला व्यापार परवाना दिला, त्यासाठी मोठा व्यवहार झाल्याचाही संशय आहे.