CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | गोव्यातील सर्व कार्यालयांसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य

CM Pramod Sawant | महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना समिती बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे ठिकाण निर्माण करणे हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे दहापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व खाती, उद्योग आणि संस्थांना पॉश कायद्यांतर्गत अनिवार्य अंतर्गत समिती (पॅनेल) स्थापन करण्याचे आणि जनजागृती, खुला संवाद व प्रभावी तक्रार निवारण यंत्रणांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बी अ‍ॅन इन्फॉर्म्ड वुमन या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंधावरील मार्गदर्शक पुस्तिका आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. ही पुस्तिका स्कॅन-गोवा द्वारे प्रकाशित असून अ‍ॅड. एमडिओ ए. डिसोझा पिन्हो यांनी लिहिली आहे. स्कॅन-गोवा २००९ पासून गोव्यातील महिला आणि मुलांसोबत काम करत आहेत. त्यांनी सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि इतर संघटनांशी सक्रियपणे संपर्क साधला आहे.

प्रशिक्षण आणि क्षमता-बांधणी उपक्रमांच्या माध्यमातून कार्यस्थळावरील लैंगिक छळासंदर्भात जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले. पिन्हो म्हणाले की, हे पुस्तक कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यासाठी तयार केलेले एक सर्वसमावेशक पण व्यावहारिक साधन आहे. तक्रार निवारण यंत्रणा, चौकशी प्रक्रिया, नियोक्त्याच्या जबाबदाऱ्या आणि तक्रारदार व प्रतिवादी यांचे हक्क याबाबत यात सविस्तर माहिती आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT