Goa Police File Photo
गोवा

Goa Police NDRF Training | गोवा पोलिसांची पुण्यात नाचक्की! चार कॉन्स्टेबलना प्रशिक्षणातून परत पाठवले

Goa Police NDRF Training | NDRF प्रशिक्षणात गोवा पोलिसांचा बेशिस्तपणा; पोलिसांच्या खोल्यांमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठवण्यात आलेल्या गोवा पोलिसांच्या चार कॉन्स्टेबलना कथित शिस्तभंगामुळे प्रशिक्षणातून परत पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस खात्याला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

या चार पोलिस कॉन्स्टेबल्सची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. प्रशिक्षणादरम्यान त्यांना शिस्त व वेळेचे पालन करण्याच्या सूचना होत्या. मात्र, हे कॉन्स्टेबल्स वेळेचे पालन न करता आपल्या मर्जीनुसार वागत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अर्ध्यावरच प्रशिक्षण त्यांना सोडावे लागले.

त्यांच्या या बेशिस्तसंदर्भात गोव्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दखल घेतली. विशेष प्रशिक्षणासाठी राज्याबाहेर पाठवलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन अपेक्षित असताना घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलातील शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या

प्रशिक्षणादरम्यान या गोवा कॉन्स्टेबल्सच्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. याशिवाय वेळेचे पालन करण्याबाबतही त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

त्यांच्याकडे दलाच्या अधिकाऱ्यांनी ४८ तासांत स्पष्टीकरण मागितले होते. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे नमूद करून त्यांना प्रशिक्षणातून परत पाठवण्यात येत असल्याचे पोलिस खात्याला कळवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT