Electric Shock Accident File Photo
गोवा

Goa Electric Shock Accident : विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

हडफडे येथील एका कार्यक्रमातील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : हडफडे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात विजेचा धक्का लागून अनिकेत मारुती पाटील (२४, रा. बेळगाव) याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडफडे येथील एका हॉटेललात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त विद्युत रोषणाई करण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कंत्राटदाराकडे काम करणारा अनिकेत पाटील हा वीज जोडणीचे काम करीत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार झटका बसला. त्याला त्वरित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT