Robbery Case File Photo
गोवा

Goa Robbery Case : दोनापावला, म्हापसा दरोड्यातील सहाव्या संशयिताला आणले गोव्यात

गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : दोनापावला व म्हापसा येथील दरोडा प्रकरणातील सहावा संशयित मोहम्मद नझीर याला गोवा क्राईम ब्रँचने दिल्लीहून ट्रान्सफर वॉरंटवर गोव्यात आणले आहे. बांगलादेशी नागरिक असलेल्या नझीरला गोवा पोलिस आणि दिल्ली स्पेशल सेलच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. दिल्लीतील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सहावा आरोपी गोव्यात आणल्याने या प्रकरणातील तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता असून, चोरीचा माल, वापरलेली शस्त्रे आणि टोळीच्या इतर साथीदारांबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात यापूर्वी ३० एप्रिल रोजी क्राईम ब्रँचने गुन्हे शाखेने आणखी पाच बांगलादेशी दरोडेखोरांना गोव्यात आणले होते. त्यामध्ये नूर इस्लाम ऊर्फ नदीम खान, सुमन हौलदार ऊर्फ पन्‍नू सैफुल इस्लाम, झाकीर हौलदार आणि सोहेल शेख यांचा समावेश होता. हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT