File Photo
गोवा

Goa News : गोव्यात नेरुळ किनाऱ्याजवळ बोट उलटली, मच्छीमार सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्यात जोरदार वारे आणि समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे नेरुळच्या किनाऱ्याजवळ शुक्रवारी सकाळी पारंपरिक मच्छीमारांची होडी उलटली. बोट उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर किनारा सुरक्षा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

होडीतील दोघे मच्छीमार पोहून सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले, तर उर्वरित तिघे उलटलेल्या होडीला धरून पाण्यावर तरंगत राहिले. गोवा किनारा सुरक्षा पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर उर्वरित तिघांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT