पणजी : कुडचडे सेक्स स्कँडलप्रकरणातील संशयित सोहम नाईक याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे. अजूनही त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत आहे.
संशयित सोहम नाईक मुलींचे काढलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सेक्स स्कँडलला वाचा फुटली होती व त्याला अटक झाली होती. एकापाठोपाठ पाच गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले त्यातील एक गुन्हा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध दोन प्रकरणामध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे तर एका प्रकरणावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध जेजेबीकडे गुन्हा दाखल झालेला आहे.