The Peacock 
गोवा

The Peacock | गोव्याचा निसर्ग आणि संस्कृतीचा वारसा चित्रांतून उलगडणारं 'द पीकॉक'!

The Peacock | इफ्फी २०२६ च्या निमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या 'द पीकॉक' या विशेष माहितीपत्रातून चित्रकार आशिष फळदेसाई यांनी गोव्याची जैवविविधता, लोकपरंपरा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते चित्रांच्या माध्यमातून उलगडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : क्रांतिराज सम्राट

इफ्फी २०२६ च्या निमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या 'द पीकॉक' या विशेष माहितीपत्रातून चित्रकार आशिष फळदेसाई यांनी गोव्याची जैवविविधता, लोकपरंपरा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते चित्रांच्या माध्यमातून उलगडले आहे.

इफ्फीच्या प्रत्येक दिवसाचे चित्रमय वृत्तांत आणि आगामी चित्रपटांची माहिती देणाऱ्या या माहितीपत्राच्या मुखपृष्ठांमधून गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे वेगळे दर्शन घडत आहे. काणकोण तालुक्यात वाढलेल्या आशिष फळदेसाई यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्टपासून कलाप्रवास सुरू केला. इफ्फीच्या मध्यापर्यंत 'द पीकॉक'चे पाच अंक प्रसिद्ध झाले आहेत.

त्यातील एका मुखपृष्ठावर गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदी चित्रित केली आहे. घनदाट जंगल आणि डोंगररांगांतून वाहणारी ही नदी गोव्याच्या जैवविविधतेचे आणि सामूहिक अस्मितेचे प्रतीक आहे. चित्रातील मोराची भरारी निसर्गातील गती आणि आशेचा संदेश देते.

दुसऱ्या चित्रातून म्हादोळ येथील फुलकर समाजाने पिढ्यानपिढ्या जपलेल्या पारंपरिक जाईच्या बागांचा वारसा मांडला आहे. मोराच्या पिसाऱ्याचे जाईच्या फुलांमध्ये केलेले रूपांतर निसर्ग, संस्कृती आणि भक्तीचे नाते अधोरेखित करते.

पर्यावरण संवर्धनाचाही संदेश

या कलाकृती केवळ सौंदर्यदर्शन घडवत नाहीत, तर गोव्याच्या सांस्कृतिक स्मृती आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेशही देतात. इफ्फीचे आणखी दिवस शिल्लक असल्याने आगामी मुखपृष्ठांतून गोव्याच्या अन्य सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडण्याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT