Goa Municipal Elections 2026 file photo
गोवा

Goa Municipal Elections 2026 | गोव्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार; पणजी महापालिका मार्चमध्ये, तर 11 नगरपालिका मे महिन्यात

Goa Municipal Elections 2026 | प्रभाग फेररचना व आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा राज्य निवडणूक आयोग पणजी महापालिकेची पुढील महिन्यात तर राज्यातील सर्व ११ नगरपालिकांच्या निवडणुका मे महिन्यात एकत्रितपणे घेण्याचा विचार करत आहे. काही नगरपालिकांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये तर काहींचा मे महिन्यात संपत असल्याने ही योजना आखण्यात आली आहे.

प्रभाग फेररचना व आरक्षण तयारी सुरू झाली आहे. डिचोली, पेडणे, वाळपई, कुडतरी काकोडा व कोणकोण या सहा पालिकांच्या निवडणुका मार्च २०२१ मध्ये झाल्या होत्या. तर म्हापसा, मडगाव, केपे, सांगे व मुरगाव येथील नगरपालिका निवडणुका एप्रिल २०२१ मध्ये पार पडल्या होत्या.

या पालिकांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष सघन पुनसर्वेक्षण (एसआयआर) प्रक्रियेनंतर प्रसिद्ध होणाऱ्या नव्या मतदार यादीच्या आधारे घेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या पणजी महानगरपालिकेची (सीसीपी) निवडणूक पुढील मार्च महिन्यात घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. प्रभाग आरक्षणाची अंतिम प्रक्रिया लवकरच पूर्ण करून त्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणूक तारीख जाहीर होताच प्रभाग आरक्षणाची अधिसूचना काढली जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील किमान निम्मी लोकसंख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत येत असल्याने या निवडणुकांकडे राजकीय पक्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ही निवडणूक म्हणजे सेमिफायनल म्हणून पाहत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

मात्र, स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल थेट विधानसभा निवडणुकांचे प्रतिबिंब असतीलच असे नाही, असेही त्यांनी नमूद केले. अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांत विक्रमी ७० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांत भाजपने आपल्या मित्रपक्षांसह उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांची ही यशस्वी वाटचाल स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही सूरच ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने कंबर कसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT