Non Invasive Postmortem Pudhari
गोवा

Goa Heavy Rain | दाबोळीत झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू : मोरजीत तिघांना बुडताना वाचवले

Goa Heavy Rain | राज्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

पुढारी वृत्तसेवा

पणजी/दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पावसाचा जोर कायम असून बुधवारी दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पणजी शहरात एका घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले, तर दाबोळी येथे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर झाड कोसळल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना राज्यातील यंदाच्या पावसातील पहिला बळी घेणारी ठरली. या दुर्घटनेत अन्य एकजण किरकोळ जखमी झाला. दरम्यान, मोरजी येथे नदीत मासेमारीसाठी गेलेली होडी उलटल्याने तीन मच्छीमार पाण्यात बुडाले; मात्र स्थानिकांच्या तत्परतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दाबोळी-माटवे येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत असलेले भलेमोठे झाड अचानक कोसळल्याने दुचाकीस्वार फ्रान्सिस्को नुनीस (वय ६२, जेटी-मुरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला चालत असलेले नीलेश गावडे (रा. बांदोडा-फोंडा) हे झाडाच्या फांद्या अंगावर पडल्याने किरकोळ जखमी झाले. दलाने अग्निशमन यंत्रसामग्रीच्या सहाय्याने झाड हटवून दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नुनीस यांना मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT