पणजी: पत्रकार परिषदेत बोलताना वाल्मिकी नाईक. pudhari photo
गोवा

Goa | आचारसंहिता तोंडावर असताना मंत्रिपद का दिले?

आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांचा भाजपला सवाल

पुढारी वृत्तसेवा

पणजी : अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आणि आचारसंहिता येऊन ठेपलेली असताना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. इतक्या कमी कालावधीत नवीन मंत्र्याने नेमके काय काम करावे? हा निर्णय केवळ सुशासनाशी संबंधित नसून, याद्वारे भाजपने राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली.

शनिवारी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. नाईक म्हणाले की, राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोडीत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची मंत्रिमंडळात नवीन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा अशावेळी झाली आहे; जेव्हा एका मंत्र्याचे पद गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ रिकामे होते.

महिला आरक्षणाचा मुद्दा असो वा एसटी समाजाच्या आरक्षणाचा आणि संसदेमधील कायद्यांचा प्रश्न असो, भाजपने यापूर्वी खूप प्रचार केला होता. परंतु, या घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा त्यांच्यातील असंतोष कमी करण्यासाठी एखाद्या महिला आमदाराला किंवा एसटी समाजातील आमदाराला मंत्रिपद दिले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या सर्व चर्चाना बाजूला सारत भाजपने आमोणकर यांना मंत्रिपद देणे म्हणजे त्यांनी केलेल्या पक्षांतरासाठी बक्षीस आहे.

आमोणकर हे पूर्वी काँग्रेस पक्षात सक्रिय होते आणि ते गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तसेच काँग्रेस विधीमंडळ गटाचे उपनेतेही राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा निर्णय म्हणजे भविष्यातील निवडणुका आणि संभाव्य पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी रणनीती आहे.

गोवागोवा फर्स्ट काम सुरूच

आम आदमी पार्टी आणि गोवा फॉर्वरडमधील गोवा फर्स्ट युती कायम आहे. फॉरवर्ड अजूनही सोबत असून युती म्हणून आमचे काम सुरू असून पक्षाचेही काम सुरू आहे, असे सांगून नाईक म्हणाले, जे कोणी पक्ष या युतीमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांचे स्वागतच आहे. आमची युती आजही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT