पणजी : गोवा मोटार वाहन कर अधिनियम, १९७४ (अधिनियम क्रमांक ८) मधील कलम ११(२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून गोवा सरकारने खाणकामाशी संबंधित मोटार वाहनांना करातून सवलत जाहीर केली आहे.
खाणकामासाठी वापरली जाणारी आणि खाण व भूगर्भ पोर्टलवर नोंदणीकृत असलेली मोटार वाहने १ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी मोटार वाहन कर भरण्यापासून मुक्त राहतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, ही सवलत संबंधित वाहनांची मालकी व ताबा त्यांच्या मूळ मालकांकडे कायम राहणे तसेच ती वाहने खाण व्यवसायात प्रत्यक्ष वापरात नसणे या अटींवर लागू राहील.
अटींचे उल्लंघन झाल्यास वाहनांवर देय कर आकारण्यात येईल. ज्या वाहनांनी १ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील कर अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच भरलेला आहे, त्यांना ही सवलत लागू होणार नाही.