Cancer care hospitals | कोल्हापूरसह 7 रुग्णालयांत समग्र कर्करोग उपचार सेवा pudhari photo
गोवा

Goa Cancer Camp | वर्षभरात 4,500 जणांची कर्करोग तपासणी

Goa Cancer Camp | डॉ. जगदीश काकोडकर : पिळयेतील अभियानात ३०० जणांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

उसगाव : पुढारी वृत्तसेवा

कर्करोगाबाबत जनजागृती करणे, नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि आजाराचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने राज्यभर कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

गेल्या एका वर्षात गोव्यातील विविध भागांत १८ शिबिरे घेण्यात आली असून, त्यामध्ये ४,५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विविध प्रकारच्या कर्करोगाचे २८ रुग्ण निदर्शनास आले, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सामुदायिक व प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी दिली.

तिस्क-उसगाव येथील पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी आयोजित कर्करोग तपासणी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सूचनेनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा दंत महाविद्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचा उसगाव व धारबांदोडा परिसरातील सुमारे ३०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या फिरत्या कर्करोग निदान बसद्वारे या भागातील नागरिकांची प्रथमच तपासणी करण्यात आली. या बसमध्ये आठ प्रकारच्या कर्करोगांची तपासणी करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी उसगाव जिल्हा पंचायत सदस्या समीक्षा नाईक, सरपंच राजेंद्र नाईक, गोवा दंत महाविद्यालयाच्या डॉ. अमिता केंकरे, आरोग्य सेवा संचालनालयाच्या डॉ. अस्मिता कुंकळ्येकर, पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. मंजुषा गावडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी समीक्षा नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. अंजली देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंजुषा गावडे यांनी केले. शिबिरात गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा दंत महाविद्यालय तसेच पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली.

रस्तेही चांगले व्हावेत...

यावेळी बोलताना डॉ. जगदीश काकोडकर यांनी उसगाव व धारबांदोडा भागातील रस्त्यांप्रमाणेच राज्यातील इतर भागांतील रस्तेही चांगले व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT