Narendraacharya Maharaj  
गोवा

Narendraacharya Maharaj | गोव्यात मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्या; जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी

Narendraacharya Maharaj | गोव्यात मराठी भाषेच्या राजभाषा दर्जाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; महाराजांनी मांडली भूमिका

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा असून शेकडो वर्षांपासून तिचा वापर गोव्यात होत आहे. भाषा संपली की संस्कृती संपते, त्यामुळे तिचे संरक्षण गरजेचे आहे. आणि त्यासाठी गोवा सरकारने कोंकणीसोबत मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी सूचना श्री संप्रदाय नाणीज मठाचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केली.

गोव्यात मूल्यवर्धित शिक्षण देणे गरजेचे असून हिंदूंचा इतिहास शिकवण्याची आता खरी वेळ आहे असेही ते म्हणाले. मंगळवारी पीठजुने गोवे येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त ३८ शाळांना वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.

पत्रकार परिषदेत बोलताना महाराज पुढे म्हणाले की, पोर्तुगीज काळात हिंदू मंदिरांची मोठ्या प्रमाणात हानी केली गेली. सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न झाला. जुने गोवे येथे पूर्वी शंकराचे मोठे मंदिर होते याची जाणीव ठेवून आपण उपपीठावर श्री गोवेश्वर महाशिव मंदिर बांधले, भव्य असे शिवलिंग आणि त्याच्या जोडीला बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली, असे महाराज म्हणाले.

समाज संघटन, संस्कृती संवर्धन आणि मुलांना सांस्कृतिक शिक्षण मिळावे यासाठी पीठातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते असे ते म्हणाले. प्रपंच करत परमार्थ करण्याचे मार्गदर्शन आपल्या अनुयायांना आपण करतो. मन अध्यात्मवादी ठेवावे व डोळे विज्ञानवादी ठेवावे, आपण जगा दुसऱ्याला जगवा ही आपली शिकवण आहे, असे सांगून अंधश्रद्धेला थारा देऊ नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

धर्मशिक्षणाची गरज

चर्चच्या शाळांत ख्रिश्चन धर्माचे, मदरसामध्ये मुस्लिम धर्माचे शिक्षण दिले जाते. मात्र हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळेच हिंदू आपल्या धर्माप्रती जास्त आदर व्यक्त करत नाहीत. त्यासाठी आजच्या घडीला देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे त्यांनी हिंदू धर्म शिक्षण देणे गरजेचे असल्याचे महाराजांनी सांगितले.

मठातर्फे झालेली कामे

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रमध्ये ४०७१ कच्चे बंधारे बांधले, रक्तदान शिबिरातून २०२५ साली १,२३,३५० बाटल्या व २०२६ मध्ये १,७१,१५० बाटल्या रक्त सरकारी इस्पितळात दिले, सीबीएससी बोर्डचे शिक्षण असलेली नर्सरी शाळा नाणीज मठात सुरू, आयुष्य इस्पितळाला तीन मृत व्यक्तींची शरीरे अभ्यासासाठी दिली, आतापर्यंत २३१ व्यक्तींनी अवयवदान केलेत, वृक्ष लावा वृक्ष वाढवा संगोपन करा या संदेशासाठी दरवर्षी शेकडो पायी दिंडीचे आयोजन, वर्षभरात पीठातर्फे ६,१८,००९ झाडे लावली, १ लाख ५७ हजार हिंदूंना हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश दिला, गोव्यातील पाच ते सहा हजार कुटुंबांची घरवापसी आदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT