Omkar Elephant Pudhari
गोवा

Omkar Elephant | 'ओंकार'साठी गोवा-महाराष्ट्रात समन्वय हवा

Omkar Elephant | वनमंत्री विश्वजित राणे : हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

ओंकार हत्तीच्या हालचालींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्राने समन्वयाने चर्चा करणे आवश्यक आहे, असे मत वनमंत्री विश्वजित राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ओंकार वारंवार गोवा-महाराष्ट्र सीमा ओलांडत असल्याने त्याच्या हालचालींचे व्यवस्थापन आणि सीमावर्ती भागातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या वन विभागात समन्वयाची गरज असल्याचे राणे म्हणाले.

दोन राज्यांच्या सीमेमुळे ओंकारच्या ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तो महाराष्ट्राच्या हद्दीत गेल्यानंतर त्याची जबाबदारी महाराष्ट्राची, तर गोव्यात आल्यानंतर गोव्याची असते. त्यामुळे या प्रश्नावर दोन्ही राज्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओंकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासंदर्भात आपण प्रधान मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा केली आहे. त्यांनी तसेच अन्य वनाधिकाऱ्यांनी ओंकारवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अधिकारी कार्यालयात बसून राहतात आणि पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतात, असे सांगत राणे यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांशी संबंधित प्रश्न असल्याने समन्वय आणि चर्चेच्या माध्यमातूनच त्यावर तोडगा काढला पाहिजे. यासाठी दोन्ही राज्यांमध्ये बोलणी सुरू असल्याचेही वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT