108 ambulance service down in Kepe  file photo
गोवा

Goa Kepe 108 ambulance service down |केपेतील १०८ रुग्णवाहिका तीन दिवसांपासून बंद

आपत्कालीन सेवांवर परिणाम; प्रशासनाचा निष्काळजीपणा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : केपे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा गंभीर बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले असून, १०८ रुग्णवाहिका सेवा सलग तीन दिवसांपासून ठप्प असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून आहेत. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे एका अपघातग्रस्ताला वेळेत मदत न मिळाल्याची धक्कादायक घटना आवेडेम येथे घडली आहे.

केपे येथे तैनात असलेली १०८ रुग्णवाहिका सेवा मागील तीन दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे सध्या केपेतील आपत्कालीन कॉल्सना कुडचडे सांगे आणि बाळी येथील १०८ सेवांमार्फत प्रतिसाद दिला जात आहे.

दरम्यान, आवेडेम येथे झालेल्या दुचाकी अपघातानंतर या त्रुटीचे गंभीर परिणाम स्पष्ट झाले. अपघातात एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर स्थानिकांनी १०८ सेवेला संपर्क साधला असता, केपेची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मडगाव येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावरून रुग्णवाहिका पाठविण्याची व्यवस्था केली. या प्रक्रियेमुळे आपत्कालीन मदत पोहोचण्यात विलंब झाला. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीने केपेतील १०८ रुग्णवाहिका बंद असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

आपत्कालीन सेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहेत. रुग्णांना वेळेत सेवा मिळणे अतिशय गरजेचे असून आरोग्यमंत्र्यांनी केपेतील घटनेची दखल घ्यावी.

- दयेश नाईक, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT