Cash for Job Scam Case | नावे उघड झालेल्यांचाही होणार तपास 
गोवा

Pooja Naik Goa Job Scam | कारागृह जेलरला कारणे दाखवा नोटीस

Pooja Naik Goa Job Scam | संशयित पूजा नाईक तुरुंगाबाहेर सोडणे पडले महागात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सरकारी नोकरी घोटाळाप्रकरणी संशयित पूजा नाईक हिच्या न्यायालयीन कोठडीसंदर्भात शहानिशा न करता एका प्रकरणात जामीन मिळाल्यावर तिला घरी जाऊ दिल्याचा ठपका ठेवून कारागृह जेलर मुकुंद गावस याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

घटनेच्या दीड महिन्यांनंतर ही कारवाई झाली आहे. या घटनेची माहिती उघड झाल्यानंतर सुमारे एक महिन्यांनंतर या जेलरच्या कारनाम्याच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक तथा तुरुंग महानिरीक्षक के. आर. चौरासिया यांनी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली होती. कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा मुख्य डीव्हीआरची पाहणी केली.

प्रवेशद्वारावर असलेल्या आयआरबी सुरक्षारक्षकांना बोलावून त्या घटनेदिवशी उपस्थित असलेल्यांचीही चौकशी केली. कारागृहातील इनवर्ड व आऊटवर्ड रजिस्टरही तपासले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर केल्याचे उघड झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT