Goa  
गोवा

GMC IVF Treatment | अनेक कुटुंबीयांसाठी आयव्हीएफ दिलासादायक

GMC IVF Treatment | कर्करोगींसह डायलिसिस रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

• २०१८ ते जून २०२५ दरम्यान गोव्यात ७ हजारांहून अधिक कॅन्सर रुग्ण
• गोमेकॉत दरमहा ४०० रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा
• दिवसाला सरासरी ४ हार्ट अटॅक रुग्ण उपचारासाठी दाखल
• स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण जास्त

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर राज्यात गेल्या काही वर्षांत कर्करोग रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच डाललिसीसच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. आरोग्य खात्याने सुरू केलेली आयव्हीएफ उपचार पद्धती अनेक कुटुंबीयांसाठी दिलासादायक ठरली आहे.

खासदार निधीतून प्राप्त झलेल्या अत्याधुनिक कर्करोग तपासणी वाहनाद्वारे राज्यभरातील नागरिकांची गावा गावात जाऊन कर्करोग तपासणी केली जात आहे. २०१८ ते जून २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत राज्यात ७ हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यात किडनी रुग्णांची संख्याही वाढत असून गोवा वैद्यकिय महाविद्यालय (गोमेकॉ) बांबोळी येथे दर महिन्याला सरासरी ४०० रुग्णांची मोफत डायलिसिस करण्यात येते. आरोग्य संचालनालयाच्या १६ केंद्रांमध्ये ७९४ रुग्ण डायलिसिस उपचार घेत आहेत. गोमेकॉत हृदयविकाराचे दिवसाला सरासरी ४ रुग्ण येत असून ज्येष्ठांसह तरुणांना आणि मुलांनाही हार्ट अटॅक येण्याच्या घटना घडत आहे.

राज्यात वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी आरोग्य खात्याने टाटा मेमोरियल केंद्र आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकायनि १० वर्षांचा दीर्घकालीन अभ्यास हाती घेतला आहे.

गोमेकॉ आवारात कॅन्सर उपचार केंद्राची इमारत उभी राहात आहे. २०१९ ते जून २०२५ या कालावधीत राज्यात २४८७ कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये तोंड, स्तन, मोठ्या आतड्याचा, फुप्फुस, अंडाशय, अन्ननलिका व गर्भाशय कर्करोग मुख्यत्वे दिसून आला. गोमेकॉत २०२२ ते डिसेंबर २०२४ या काळात ३८९७ कर्करोग रुग्ण नोंदले गेले.

यामध्ये स्तन, पचनसंस्था, डोके व मान, रक्त व लसिकेच्या ग्रंथी, लघवीविषयक अवयव, फुप्फुस व त्वचामध्ये आढळणारा कर्करोग यांचा समावेश आहे. यात पुरुष १६२० तर महिला २२७७ अशी नोंद झाली आहे. स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशयाशी संबंधित कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा दंत महाविद्यालयात २०१८ ते जून २०२५ या काळात तोंडाच्या कर्करोगाचे ७२७ रुग्ण आढळले.

हृदयविकाराचे दिवसाला सरासरी ४ रुग्ण

गोमेकॉ गेल्या दोन वर्षांचा काळात एकूण २.६०४ हार्टअटॅकचे रुग्ण दाखल झाले. दररोज सरासरी ४ रुग्ण उपचाराला दाखल होत आहेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ व २०२५ मध्ये हृदयविकाराच्या संख्येत वाढ झाली आहे.

गोमेकॉत दर महिन्याला ४०० जणांचे डायलिसिस...

गोमेकॉ मध्ये सध्या दरमहा सरासरी ४०० रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार मिळत आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी येथे २४ अत्याधुनिक डायलिसिस यंत्रणा, १७ प्रशिक्षित तंत्रज्ञ, आणि २४ तास कार्यरत डायलिसिस युनिट उपलब्ध आहेत, तर आरोग्य संचालनालयाच्या राज्यभरातील १६ डायलिसिस केंद्रांमध्ये सध्या ७९४ रुग्ण नोंदणीकृत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण १३५ डायलिसिस यंत्रणा आणि ७४ तंत्रज्ञ कार्यरत आहेत. राज्यात वाढत्या मूत्रपिंड निकामी होणाऱ्या रुग्णांची गरज लक्षात घेता, गोमेकॉमध्ये आणखी डायलिसिस यंत्रणा वाढवण्याचा विचार केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT